साजनमध्ये साहसाचे निसर्गाशी मिलन होते
स्टर्लिंग नेचर ट्रेल्स साजनमध्ये सकाळी एका संपूर्ण नवीन जगाकडे तुमचे डोळे उघडतात. विक्रमगढच्या अस्पर्श प्रदेशामध्ये स्थित असलेले, आमचे हे रिसॉर्ट निसर्गप्रेमी आणि साहस शोधकांना निसर्गमातेच्या बंधनात काही दिवस घालवण्यास प्रवृत्त करते. स्टर्लिंग नेचर ट्रेल्स साजनला भेट देऊन पटकन एखाद्या शांत ठिकाणी जाण्याच्या तुमच्या विचारांना उत्तेजित करा, जे मुंबई, पुणे आणि नाशिकपासून फक्त एका छोट्या ड्राइव्हच्या अंतरावर आहे.
एखाद्या ट्रीटॉप रूममध्ये पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येणे असो किंवा सरळ पहाटेच्या दवावरून एखादी वाऱ्याची झुळूक अंगावर घेणे असो, स्टर्लिंग नेचर ट्रेल्स साजन मधील प्रत्येक छोटी गोष्ट त्यापाठोपाठ येणाऱ्या थरारक दिवसासाठी तुम्हाला शांतपणे तयार करते. एका संतुष्ट करणाऱ्या ब्रेकफास्ट नंतर, झुलता बर्मा ब्रिज क्रॉस करून तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घ्या. तुम्ही एक निपुण तिरंदाज देखील असू शकता, ज्याबद्दल तुम्हाला नेहेमीच खात्री होती, रोप लॅडर वरून किंवा आडव्या नेटवरून वरती चढा. तुम्ही कायाक घेऊन सभोवतीचे जलप्रवाह देखील एक्सप्लोअर करू शकता.
या नंतर, स्थानिक मसाल्यांसह शिजवलेल्या पोषक महाराष्ट्रीयन भोजनावर तुटून पडा, जे हार्दिकतेने तुम्हाला सर्व्ह केले जाते. स्टर्लिंग नेचर ट्रेल्स साजन आश्चर्यकारकपणे अगदी जवळ, तरीही त्यातील अस्पर्शित परिसरामुळे अत्यंत दूरवर असलेल्या जगात आहे.