स्कूल ट्रिप्स - फाउंडेशन

आमचे रिसॉर्ट हे मुंबई जवळ स्कूल कॅम्प आयोजित करणाऱ्या सर्वात मोठ्या आयोजकांपैकी एक आहेत. आम्ही सर्वोत्तम स्कूल पॅकेजेस ऑफर करतो!

बिल्डिंग ब्लॉक्स

निसर्ग आणि साहसाद्वारे शिकण्याच्या एका संपूर्ण नवीन जगामध्ये आपले स्वागत आहे. मुंबई जवळ स्कूल कॅम्प आयोजित करणाऱ्या सर्वात मोठ्या आयोजकांपैकी एक असल्याने, आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी विस्मयजनक पॅकेजेस ऑफर करतो ज्यामुळे ते निसर्गाच्या सान्निध्यात जाऊ शकतील आणि मार्गदर्शनासह साहसी स्पोर्ट्सने भरगच्च फिल्ड ट्रिप्सचा आनंद लुटू शकतील.

वनांमधून मार्गक्रमण करणे आणि दऱ्याखोऱ्या पार करण्यापासून ते नद्यांमध्ये कायाकिंग करण्यापर्यंत, प्रत्येक गतिविधी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणित तज्ञांद्वारे निवडली जाते आणि सहाय्यता दिली जाते.

shutterstock 274216760
shutterstock 275504699

सुरक्षा साधने आणि उपकरणांच्या वापरासह, विद्यार्थी वयाला-उचित, मूलभूत जीवन तंत्रे जसे दोरीला गाठ मारणे, रॅपेलिंग करणे, स्वयं-बचाव आणि रायफल शूटींग शिकतात.

नेचर ट्रेल्स रिसॉर्टमध्ये विद्यार्थ्यांना उर्जा चक्र, जल चक्र आणि आदिवासी जीवन यासारख्या संकल्पनांविषयी प्रशिक्षित करण्यासाठी मजेदार पर्यावरणीय खेळ आणि कोड्यांद्वारे विस्मयजनक सत्रे सादर केली जातात. फिल्ड ट्रिप रिपोर्ट फाईल करणे आणि जंगल कुकींगपासून ते शुष्क वनौषधींच्या संग्रहापर्यंत विद्यार्थी अशा गतिविधींचा अनुभव घेतात ज्या त्यांनी पूर्वी कधीच पाहिल्या नसतील.

Children-summer-camps-india
corporate-team-building-near-mumbai
children-activity-camps-near-mumbai-2
rafting-2071892 1920
Children-activity-camps-near-mumbai
DSC07760

नेचर ट्रेल्स रिसॉर्टमध्ये 14 वर्षे वयाच्या वरील विद्यार्थ्यांना काही विशिष्ट गतिविधी पूर्ण केल्यानंतर ड्यूक ऑफ एडिनबर्ग स्कीमचा पुरस्कार देखील प्रदान केला जातो. जरी नेचर ट्रेल्स कॅम्प अशी जागा आहे की जेथे मुले साहसाच्या शोधात असतात, तरी अखेरीस ते त्यांचे अधिक स्वयं-आश्वस्त आणि आत्मविश्वासपूर्ण स्वरूप शोधून काढतात.

फायदे

बस पकडा

मुंबई मधून, आणि अगदी त्याहून देखील पुढे, अनेक प्रतिष्ठीत शाळा नेचर ट्रेल्स रिसॉर्टमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना जीवनाचे धडे देतात. तुमच्या विद्यार्थ्यांसाठी नेचर ट्रेल्स स्कूल कॅम्पची योजना कशी करू शकता याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, किंवा तुमची मुले सध्या जेथे शिकत आहेत त्या शाळेला याची शिफारस करण्यासाठी, आम्हाला कॉल (टोल-फ्री) करून आमच्या तज्ञांच्या संपर्कात रहा.निसर्गाच्या समीप संघ तयार करण्याची भावना लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता जीवन तंत्रेसाहस कौशल्ये