Promotions

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका, कोलाड

Village: Kamath, Taluka: Roha, Dist: Raigadh, Kolad, Maharashtra - 402109
+91 80 3542 8359 | Call Us

  As per the recent guidelines from the Government, our resorts in Maharashtra will not be operational till 15th April 2021. Kindly reach out to us in case of any queries  

व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थरार

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका मध्ये निसर्गाच्या सहवासात रेंगाळत काही दिवस घालवा, किंवा राफ्टिंग करून स्वतःच्या मर्यादा पार करा. गोवा-महाराष्ट्र हायवेवर स्थित असलेले आमचे कोलाड मधील हे रिसॉर्ट नीरव कुंडलिका नदीच्या नयनरम्य काठांवर वसले आहे, एक आदिम आणि अस्पर्शित स्थान.

राफ्टिंगच्या अखेरच्या टप्प्याच्या अगदी जवळ स्थित असलेले, आमचे रिसॉर्ट अशा लोकांसाठी एक परफेक्ट स्टे आहे ज्यांना महाराष्ट्रामध्ये, राफ्टिंगचा थरार अनुभवायचा आहे, संपूर्ण वर्षभर केव्हाही. उत्कृष्ट व्यवस्था आणि गाईड करण्यासाठी प्रोफेशनल व्यक्तींसह, प्रथमच राफ्टिंग करणारे थोडे खालच्या पाण्यामध्ये आणि कुंडलिका नदीच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद घेत राफ्टिंग करू शकतात. अधिक अनुभवी असलेले जास्त मोठ्या आणि जास्त खवळलेल्या प्रवाहांना वश करू शकतात. आम्ही इतर साहसी गतिविधी देखील आयोजित करतो. बर्मा ब्रिजवर आत्मविश्वासाने पावले टाका, किंवा वृक्षांवरून शिताफीने घसरत या, झिपलाईनिंगच्या कलेवर प्रभुत्व मिळवा. जसे तुम्ही फेरफटका मारण्यासाठी रिसॉर्टच्या नयनरम्य किनाऱ्यांकडे कूच करता तेव्हा असंख्य देशीविदेशी पक्ष्यांच्या प्रजातींचा परिचय करून घ्या. गेस्ट कायाकिंग करताना काही आनंददायक क्षण फक्त सूर्यास्त पाहाण्यात घालवण्याचे देखील निवडू शकतात.

जेव्हा या सर्व साहसी स्पोर्ट्सनंतर जठराग्नी प्रज्वलित होतो, तेव्हा एक साधे तरीही अस्सल महाराष्ट्रीयन भोजन आपली प्रतिक्षा करत असेल. रात्री निद्रेच्या कुशीत जाण्यापूर्वी मुक्त आकाशाखालील बोनफायर तुमच्यासाठी परफेक्ट असू शकते.

शून्य-प्रदूषण झोनमध्ये स्थित असलेले हे निसर्गाचे निवासस्थान व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि इतर असंख्य थरारक गतिविधी करण्यासाठी आदर्श आहे!

व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी एक स्वर्गीय स्थळ

 
व्हाईट वॉटर राफ्टिंगएअर-कंडिशन्ड, प्रिमियम टेन्टअस्सल महाराष्ट्रीयन क्यूसीन
देशीविदेशी पक्ष्यांसह संमेलनकायाकिंगरिव्हरव्ह्यू रूम्स


विलक्षण सौंदर्य आणि एका भव्य साहसाची भूमी!

 

Rafting - Kundalika


व्हाईट वॉटर राफ्टिंग

Zipline - Kundalika 1


झिप-लाईनिंग

Burma Bridge - Kundalika 1


बर्मा ब्रिज

Kayaking - Kundalika


कायाकिंग

Tarzan Swing - Kundalika


टारझन स्विंग

Table Tennis - Kundalika


टेबल टेनिस

Carom - Kundalika

कॅरम

साहसानंतरची नीरवता


कोलाड राफ्टिंगच्या अखेरच्या टप्प्यावर स्थित असलेले, आमचे निवास साहसाच्या एका दमवणाऱ्या दिवसानंतर विश्रांतीसाठी सर्वोत्कृष्ट आहेत. प्रिमियम एसी टेन्ट, आणि रिव्हर व्ह्यू रूम्सपासून ते रेग्यूलर एसी टेन्ट पर्यंत, स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका तुमचे कुटुंबिय, मित्रांच्या आरामदायक निवासासाठी डिझाईन केलेल्या निवास पर्यायांची एक श्रेणी सादर करते. असंख्य अत्याधुनिक एमिनिटीज आणि सुविधांसह, साहसाचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी यापेक्षा उत्तम अशी दुसरी कोणतीही जागा असू शकत नाही.

मंत्रमुग्ध करणारे निवासस्थान आणि पूर्ण वर्षभर राफ्टिंगसाठी आम्हाला भेट द्या.
 

अस्सल, स्थानिक स्वादांची चव

Dining Hall - Kundalika 1

आम्ही पोषक भोजन सर्व्ह करतो ज्यामध्ये तुम्हाला घरचा स्वाद मिळतो. आमच्या सर्व डिशेस आजूबाजूच्या गावातील निपुण शेफद्वारे अस्सल स्थानिक रेसिपीमध्ये बनवल्या जातात. आमच्या स्वादिष्ट बुफे भोजनाच्या विस्तृत प्रकारांसह तुमच्या जिव्हारसांना तृप्त करा. भोजनाची वेळ म्हणजे स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका येथे सुखदायक प्रसंग असतो!
 

भव्य समारंभ आयोजित करा


आमच्या प्रशस्त इव्हेंट हॉलमध्ये समारंभ आयोजित करून एक अद्वितीय लोकेशन आणि अखंड सेवांसह तुमच्या पाहुण्यांना आश्चर्यचकित करा. तुमच्या पुढच्या कौटुंबिक संमेलनासाठी किंवा कॉर्पोरेट इव्हेंटसाठी स्टर्लिंग नेचर ट्रेल्स कुंडलिका एक आदर्श व्हेन्यू आहे. तुम्हाला समारंभ सुरळीतपणे आयोजित करण्यात मदतीला तयार असलेल्या मैत्रीपूर्ण इन-हाऊस टीमसोबत, आम्ही प्रोजेक्टर्स आणि ऑडिओ-व्हिज्युअल सिस्टीमसारखी आधुनिक उपकरणे देखील पुरवतो.
 

Conference Hall KUNDALIKA

साहसाची सुरवात घरूनच होते