Promotions

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स दूरशेत, खोपोली

Village: Durshet, Taluka: Khalapur, District: Raigadh, Khopoli, Maharastra - 410202
+91 80 3542 8357 | Call Us

रहस्यमय फॉरेस्ट ट्रेल्सचा मागोवा घ्या

सह्याद्री पर्वतशिखरे आणि जंगलांमध्ये लपून बसलेले, स्टर्लिंग नेचर ट्रेल्स दूरशेत, खोपोली म्हणजे संपूर्ण शांततेचे एक ओऍसिस आहे. निसर्गप्रेमींसाठी हा स्वर्ग 35 एकराच्या भव्य नैसर्गिक लँडस्केपमध्ये विस्तारलेला असून खोपोली-पाली रोडवर स्थित आहे आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेपासून केवळ 15 मिनिटांवर आहे.

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स दूरशेत येथे, पक्षांचा ऑर्केस्ट्रा आणि सळसळणारी जंगले ऐका, जसे तुम्ही गूढ जंगल ट्रेल्समध्ये जंगली प्रदेशाचा मागोवा घेता. टीक ट्रेल्सवर धडपडा, जे 'फ्लेम ऑफ द फॉरेस्ट' पळस वृक्षांमध्ये आणि कुठेकुठे सिल्व्हर ओकमागे लपलेले आहेत. तुम्ही तुमचा दिवस आमच्या बरोबर निसर्गासह एकरूप होऊन घालवू शकता किंवा विभिन्न साहसी गतिविधींमध्ये भाग घेऊन तुमच्या ऍड्रेनलिनला उत्तेजित करू शकता. झुलत्या बर्मा ब्रिजवर चाला किंवा नेम धरा आणि बाण सोडा, जसे तिरंदाजी करण्याची एक दुपार तुमच्यासमोर उलगडते.

असा गेटअवे जो सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि जंगलांमध्ये एका शांत आणि स्थिरचित्ताच्या अनुभवाचे वचन देतो त्यासोबत 7 पेक्षा जास्त विभिन्न प्रकारच्या साहसी गतिविधी देखील ऑफर करतो!

जंगलामध्ये तुमची पदचिन्हे उमटवा

 
25-एकर जंगलाद्वारे वेढलेलेटीम स्पोर्ट्स (क्रिकेट, फुटबॉल)अस्सल होम-स्टाईल महाराष्ट्रीयन क्यूसीन
नेचर रिसॉर्टस्विमिंग पूलएअर-कंडिशन्ड लक्झरी टेन्ट


तुमच्या वीकएन्ड घराकडे ट्रेक करा!

 

Swimming pool at Sterling Nature Trails Durshet


स्विमिंग पूल

Zipline - Durshet


झिप-लाईनिंग

Burma Bridge - Durshet 2


बर्मा ब्रिज

Net Climbing - Durshet 1


नेट क्लाईम्बिंग

Table Tennis - Durshet


टेबल टेनिस

Archery - Durshet 1


आर्चरी

Carom - Durshet


कॅरम

Campfire - Durshet


कॅम्पफायर

जंगलामध्ये इकडेतिकडे भटकून आल्यानंतर किंवा साहसी गतिविधीमध्ये स्वतःला आव्हान दिल्यानंतर, चविष्ट अस्सल महाराष्ट्रीयन भोजनाचा आस्वाद घ्या. बोनफायर जवळ जुन्या मित्रांसह गोष्टी शेयर करून, किंवा नवीन मित्रांसह संगीतात रममाण होऊन तुमच्या दिवसाची अखेर करा.

गेस्ट त्यांच्या पसंतीनुसार एसी रूम किंवा कॉटेज अशा निवास पर्यायाच्या श्रेणीमधून निवड करू शकतात. उत्तम-प्रकारे सज्ज असलेला कॉन्फरन्स हॉल, संपूर्ण-विकसित किचन, आणि डायनिंग हॉलसह दूरशेत मधील आमचे रिसॉर्ट म्हणजे व्हेकेशनसाठी आदर्श निवड आहे.

तुमचे जंगलातील घर


स्टर्लिंग नेचर ट्रेल्स दूरशेत, खोपोली सह्याद्रीच्या सावलीत एक शांतिमय निवास ऑफर करते. आम्ही तीन विभिन्न प्रकारचे निवास ठेवतो ज्यामध्ये 16 क्लासिक एसी रूम्स, 7 मोठी आणि 4 लहान कॉटेजेस समाविष्ट आहेत. तुमच्या पसंतीनुसार तुम्ही ते घेऊ शकता. जी कोणतीही रूम तुम्ही राहाण्यासाठी पसंत कराल, त्यामध्ये तुम्हाला अत्याधुनिक सोयीसुविधा प्राप्त होतील जसे फ्री वाय-फाय सुविधा आणि अभिरूचीसह डिझाईन केलेले इंटिरीयर.

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स दूरशेत, खोपोली, एका आरामदायक आणि शांतचित्त करणाऱ्या अनुभवासाठी तुम्हाला आमंत्रित करत आहे, तुमच्या बजेटमध्ये.
 

परंपरेचा स्वाद

Dining Hall - Durshet

स्टर्लिंग नेचर ट्रेल्स दूरशेत, खोपोली, तोंडाला पाणी सुटणाऱ्या अस्सल महाराष्ट्रीयन डिशेस ऑफर करते ज्या सर्वोत्तम स्थानिक घटकांसह तयार केलेल्या आणि पारंपारिक पद्धतीने सर्व्ह केल्या जातात. आम्ही आपल्याला इतर भारतीय डिशेस देखील सादर करतो. आमचे लज्जतदार भोजन तुम्हाला त्यापाठोपाठ येणाऱ्या साहसांची टेस्ट देते.
 

 

खास समारंभांसाठी जागा


आमच्या जादुई व्हेन्यूमध्ये तुमचे खास समारंभ आयोजित करा. स्टर्लिंग नेचर ट्रेल्स दूरशेत, खोपोली येथील बान्क्वेट हॉल कॉर्पोरेट आऊटिंग्ज, ऑफीस मिटींग्ज, नवीन लॉन्च, आणि इतर सामाजिक समारंभ जसे वाढदिवस आणि वर्धापन दिन साजरा करण्यासाठी परिपूर्ण आहे. आमचे रिसॉर्ट किलबिलणाऱ्या पक्षांचे सूर आणि सभोवतालच्या निर्मळ जंगलाच्या सोबतीने समारंभ आयोजित करण्यासाठी एक भव्य आणि आकर्षक लोकेशन आहे.
 



 

Conference Hall at Sterling Nature Trails Durshet

साहसी गतिविधी